रेल्वे प्रशासनाने देशातील तब्बल १३० मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देऊन या गाड्यातील सर्व प्रकारच्या श्रेणीच्या तिकीट दारांमध्ये मोठी वाढ केली आहे. या दर वाढीमुळे रेल्वेतील एसी-१ आणि एक्जीक्यूटिव श्रेणीच्या तिकीट दरात तब्बल प्रती यात्री ७५ रुपयांची, एसी २ आणि ३ चेयरकारच्या दारवाढीत ४५ रुपयांनी तर स्लीपर श्रेणीच्या तिकीट दरामध्ये तब्बल ३० रुपये रुपये प्रति यात्री दरवाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना एका पीएनआरवर (सहा प्रवाशी) तिकीट बुक केल्यास एसी १मध्ये ४५० रुपये, एसी २ आणि ३ साठी २७० रूपीने तर स्लीपरसाठी १८० रुपये ही जास्त द्यावे लागणार आहे. १ ऑक्टोबर पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.