भारतातील कमी होत असलेली वचक लक्षात घेऊन काँग्रेसने भारत जोडो यात्रेला प्रारंभ केला. सध्या भारत जोडोची जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या तेलंगणात काँग्रेसची ही यात्रा सुरु होती. महाराष्ट्राचे माजी मंत्री नितीन राऊत हे हैदराबादमध्ये या यात्रेत सहभागी झाले होते.
यावेळी नितीन राऊत यांचा अपघात झाला आहे. ते सध्या हैदराबादमधील बासेरी रुग्णालयात दाखल आहेत. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहेत. आणि सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे.
यात्रेत पळत असताना नितीन राऊत हे खाली जमिनीवर पडले. यावेळी त्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. डोळा सूजला असून तो काळा निळा झाल्याचं दिसत आहे. त्यांच्या डोक्याला देखील मार लागला आहे. त्यामुळे डोळा आणि कानाच्यामधल्या भागात फ्रॅक्चर झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं आहे.
यानंतर राहुल गांधी यांनी राऊत यांची फोनवरुन चौकशी केली आहे. मल्लिकार्जून खर्गे, के.सी. वेनुगोपाल आणि के, राजू यांनी राऊतांची भेट घेतली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.