Tuesday, October 1, 2024

23 जानेवारी: जगातील सर्वात विनाशकारी भूकंप; अवघ्या काही सेकंदात गेला लाखोंचा जीव

दुनिया23 जानेवारी: जगातील सर्वात विनाशकारी भूकंप; अवघ्या काही सेकंदात गेला लाखोंचा जीव

भूकंप सर्वात घातक नैसर्गिक आपत्तींपैकी एक आहे. पृथ्वीच्या पोटात भूगर्भीय हालचाली होतात आणि त्यामुळे होणा-या भूकंपाने काही मिनिटांत अनेक जीव जातात तसेच संपूर्ण शहर उद्ध्वस्त होते. असाच एक मानवी इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भूंकप 23 जानेवारी 1556 साली झाला होता. या भूंकपाची तीव्रत रिश्टर 8 इतकी होती. या भूकंपात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

23 जानेवारी 1556 रोजी चीनच्या शांशी येथे विनाशकारी भूकंप झाला. हा जगातील सर्वात मोठा भूकंप मानला जातो. या भूकंपात लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. सुमारे 8 रिश्टर तीव्रतेच्या या भूकंपामुळे अनेक ठिकाणची जमीन धसली होती. या भूकंपात सुमारे 8 लाख 30 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. हा भूकंप इतका भयंकर होता की या प्रांतातील सुमारे ६० टक्के लोकसंख्या नष्ट झाली होती. या भूकंपाने 520 मैल (840 किमी.) क्षेत्र नष्ट झाले. भूस्खलनामुळे अनेक घरे कोसळली आणि त्या घरांच्या ढिगाऱ्याखाली दबून लाखो लोकांचा मृत्यू झाला.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles