Sunday, June 23, 2024

दाऊदने पाकिस्तानी पठाण महिलेसोबत केलं दुसरं लग्न आणि बदलला पत्ता

दुनियादाऊदने पाकिस्तानी पठाण महिलेसोबत केलं दुसरं लग्न आणि बदलला पत्ता

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमनं दुसरं लग्न केल्याचं समोर आलं आहे. हसीना पारकरचा मुलगा आणि दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकरनं राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) समोरील चौकशीत दाऊदबाबतचे बरेच खुलासे केले आहेत. अलीशाहनं एनआयएला सांगितलं की, दाऊदने एका पाकिस्तानी पठाण महिलेसोबत दुसरं लग्न उकरलं आहे. पण त्यानं पहिली पत्नी महजबीला तलाक दिला नाहीये.

दाऊदनं फक्त दुसरं लग्न केलं नसून त्यानं पाकिस्तानातील कराचीमधील आपलं ठिकाणही बदललं आहे. टेरर फंडिंग प्रकरणात एनआयएनं चार्जशीट दाखल केली आहे. यामध्ये तपास यंत्रेणेन म्हटलंय की, अलीशाहनं आपल्या जबाबात दाऊदच्या वंशजाची संपूर्ण माहिती दिली आहे. दरम्यान एनआयएनं याप्रकरणात दाऊद इब्राहिम आणि त्याच्या निकटवर्तींविरोधात गुन्हा दाखल केला होता आणि काही जणांना अटकही करण्यात आली होती.

एनआयएला मिळालेल्या माहितीनुसार, देशातील मोठे नेते आणि व्यावसायिकांवर दाऊद इब्राहिम हल्ला करण्याच्या फिराकमध्ये आहे. याच्यासाठी त्यानं विशेष टीमची स्थापना केली आहे. ही टीम काही शहरात हिंसा फैलवू शकते.

अलीशाहच्या जबाबानुसार, दाऊदचे चार भाऊ आणि चार बहिणी आहेत. दाऊद दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीला तलाक दिल्याची अफवा पसरवत आहे, परंतु असं काही नाही. शिवाय तो आता कराचीमध्ये अब्दुल्ल्ला गाजी बाबा दर्गाच्या मागे असलेल्या रहीम फाकीजवळ डिफेंस कॉलनीमध्ये राहत आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles