भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आज पासून सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना बावनकुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर जहरी टीका केली आहे.
शरद पवार जादूटोणा करणारे भोंदूबाबा आहेत. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंवर देखील जादूटोणा केलााय, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवर केलीये.
जादूटोणा करणारा बाबा कोण हे पूर्ण देशाला अन् महाराष्ट्राला माहिती. शरद पवारांच्या संपर्कात कोणी आलं तर तो सूटत नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय.
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावरून आता नवा वाद होण्याची शक्यता आहे. आता राष्ट्रवादी याला काय प्रत्युत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणारे.