महाराष्ट्रात होणाऱ्या 2024 चा विधानसभा निवडणुकीसाठी आत्तापासूनच सगळ्या पक्षाची तयारी सुरु आहे. मात्र शिवसेनेत बंड झाल्यापासून कोणाचाच भरोसा राहिला नाही. कोणता नेता केव्हा नाराज होईल सांगता येत नाही. अशातच राष्ट्रवादी पक्ष सध्या अडचणीत असल्याचं पहायला मिळतयं.राष्ट्रवादीच्या काही नेत्यावर गु्न्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा शिरुर आणि बारामती मतदारसंघात सत्ता यावी यासाठी भाजपकडून पुरेपुर प्रयत्न केला जात आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्याचविषयी या व्हिडीओतून जाणून घेऊयात
छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिका साकारणारे अभिनेते म्हणजे अमोल कोल्हे. ज्यामुळेे त्यांनी महाराष्ट्राच्या लोकांची मन जिंकली. मात्र फक्त अभिनयात छाप न पाडता राजकारणातही ते चांगलेच प्रसिद्ध आहेत.
अमोल कोल्हे हे एक फर्डे वक्ते आणि विरोधकांवर तु़टून पडणारी वाणी म्हणून ओळखले जातात. सध्या अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघातील फेऱ्या कमी झाल्या आहेत. तसेच त्यांच्या भाजप नेत्यासोबतच्या भेटीगाठी देखील वाढल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अमोल कोल्हे भाजपकडे जाणार का अशी चर्चा सुरु आहे. याच नेमकं कारण काय थोडक्यात जाणून घेऊयात.
गुजरातच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. सगळे पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करत आहेत. तसेच गुजरातमध्ये राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराने राजीनामा दिल्यानं राष्ट्रवादी अडचणीत आहे. याचवेळी या निवडणूकीसाठी प्रचारक म्हणून काही नावांची यादी जाहीर करण्यात आली होती. ज्या यादीत अमोल कोल्हे याचं वगळण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षाने असं का केलं हे अद्याप माहीत नाही. त्यामुळे कोल्हेंना देखील धक्का बसलाय.
याचं अजून एक कारण पहायला गेल्यास सत्तेतून पायउतार झाल्यानंतर राष्ट्रवादीचं पहिलं चिंतनशिबिर शिर्डीत पार पाडलं. हाताला पट्ट्या बांधलेल्या अवस्थेत थेट रुग्णालयातून शरद पवार शिबिरात आले. जो चर्चेचा विषय ठरला . मात्र याच शिबिरात पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी पाठ फिरवली.. गेल्या काही दिवसांपासून खासदार कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र आता त्यांनी पक्षाच्या शिबीराकडेही पाठ फिरवल्याने ते नाराज असल्याची माहिती आहे.
ज्या अमोल कोल्हेंच्या आक्रमक वाणीने विरोधक गार होतात, ज्य़ा 2019 च्या शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या शिवाजीराव अढळराव पाटीलांना धूळ चारून विजयी झाले होते. त्यांच्या भाषणांनी अफाट लोकप्रियता मिळवली असं असून देखील कोल्हेची गैरहजेरी आणि स्टार प्रचाकर यादीत वगळण्यात आलेलं नाव. तर दुसरीकडे कोल्हेंची भाजपशी वाढत असलेली मैत्री यावरुन आता कोल्हे शिंदे गटात जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहेे.