महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू करण्यात आलेली आणखी एक योजना बंद होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू केलेल्या शिवभोजन थाळी योजना बंद होण्याची शक्यता दाट आहे.
तब्बल चार महीने होत आले तरी नवनियुक्त सरकारने शिवभोजन थाळी केंद्र चालकांना अनुदान दिले नाही. दसरा आणि दिवाळी हे दोन्ही सण केंद्र चालकांचे अंधारातच गेले आहे. चार महीने अनुदान न दिल्याने महाविकास आघाडी सरकारची शिवभोजन थाळी ची योजना बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला जातोय
त्यांतर शिवभोजन थाळीचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे, त्यातच शिवभोजन थाळीच्या केंद्र चालकांना अनुदान मिळत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या योजनेबद्दल स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवभोजन थाळी बंड होणार नाही, असा खुलासा केला होता. मात्र आता अनुदान मिळालं नसल्याने ही योजना बंद होणार असल्याचं बोललं जातंय.