Saturday, December 21, 2024

छत्रपती शिवाजी महाराजांबाबतची वादग्रस्त वक्तव्ये; शिंदे गट भाजपावर नाराज…

देशछत्रपती शिवाजी महाराजांबाबतची वादग्रस्त वक्तव्ये; शिंदे गट भाजपावर नाराज…

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. या वक्तव्यावरून शिंदे गटातील आमदाराने नाराजी व्यक्त केली.

भाजपच्या नेत्यांनी विचार करुन छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बोलायला होवं. असा आपमान सहन केला जाणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा असा अपमान होत असेल तर एक दिवस दोन्ही पक्षात वितुष्ट निर्माण होईल. त्यानंतर होणारे परिणाम दोन्ही पक्षांना भोगावे लागतील’, असा इशारा बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजपला दिलाय.

दरम्यान, सध्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभरात वादंग उठलं आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केलं होतं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त केलं. तर भाजपचे नेते सुधांशू त्रिवेदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. त्यामुळे राज्यात सध्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles