Friday, November 15, 2024

RSS प्रमुख मोहन भागवत यांचं LGBT समुदायावर मोठं वक्तव्य

देशRSS प्रमुख मोहन भागवत यांचं LGBT समुदायावर मोठं वक्तव्य

• इस्लामला या देशात काहीही धोका नाही. फक्त त्यांना आम्ही मोठे आहोत हा भाव सोडावा लागेल, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केलं.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिम, इस्लाम आणि एलजीबीटी समुदायावर मोठं वक्तव्य केलंय. या वक्तव्यांवर सध्या मोठा ऊहापोह सुरु आहे. भागवत एका मुलाखतीत बोलताना म्हणाले, आपली ओलक, राष्ट्रीयत्व आणि सर्वांना आपलं मानणं तसेच सर्वांना सोबत घेऊन चालण्याची प्रवृत्ती हिंदू धर्माची आहे. इस्लामला या देशात काहीही धोका नाही. फक्त त्यांना आम्ही मोठे आहोत हा भाव सोडावा लागेल..

मोहन भागवत यांनी एलजीबीटी समुदायावरही मोठं वक्तव्य केलं. या समुदायाची त्यांनी प्रथमच जाहीरपणे समर्थन केलं. ‘ऑर्गनायझर’ आणि ‘पांचजन्य’ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

• LGBT समुदायावर काय म्हणाले?

मोहन भागवत यांनी प्रथमच एलजीबीटी समुदायाचं समर्थन केलं. ते म्हणाले, अशा व्यक्तींच्या खासगी गोष्टींना समजून त्यांना मान दिला पाहिजे. संघ या विचारांना प्रोत्साहित करेल. मानवाचं अस्तित्व आहे, तेव्हापासून अशा प्रकारच्या व्यक्ती आहे.

हे जैविक आहे, जीवन जगण्याची पद्धत आहे. त्यांच्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचे हक्क मिळाले पाहिजेत. आपणही या समाजाचा भाग आहेत, असे त्यांना वाटले पाहिजे.

• तृतीय पंथियांबद्दल बोलताना मोहन भागवत म्हणाले,

ट्रान्सजेंडर ही समस्या नाही. तो एक पंथ आहे. त्यांच्या देवी-देवता आहेत. आता तर त्यांचे महामंडलेश्वरदेखील आहेत. संघाचा यावर फार काही वेगळा विचार नाही. हिंदू परंपरेत यावर आधीच विचार झालेला आहे.

मुस्लिमांविषयी काय म्हणाले?
मोहन भागवत म्हणाले, हिंदू ही आमची ओळख, राष्ट्रीयत्व, सर्वांना आपलं मानणं तसेच सोबत घेऊन चालण्याची प्रवृत्ती आहे. हिंदुस्थान नेहमीच हिंदुस्थान असावा, एवढाच मुद्दा आहे. आज भारतात जे मुस्लिम आहेत, त्यांना इथे कोणताही धोका नाही.

त्यांना रहायचं असेल तर रहावं. ही त्यांची इच्छा. इस्लामला काही धोका नाही, पण आम्हीच मोठे आहोत, हा हट्ट सोडला पाहिजे. एकेकाळी आम्ही राजा होतो, आता पुन्हा राजाच बनायचंय, ही भावना सोडली पाहिजे… एखादी हिंदु व्यक्तीही अशा विचारांची असेल तर त्यालाही अशा भावनेचा त्याग करावा लागेल.

• धर्म एकच सनातन धर्म

हिंदू आणि मुस्लिम हे धर्म नसून हे चुकीचं नाव आहे. धर्म एकच आहे तो सनातन आहे. तो सृष्टीची धारणा करणारा शाश्वत नियम आहे. तो कधीही बदलत नाही. असे मत राष्ट्रीय स्वंयमसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. वाशिम जिल्ह्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles