Thursday, November 21, 2024

गॅसची पाईपलाईन फुटल्याने भीषण आग; मध्यरात्री पुण्यात ‘अग्नितांडव’

महाराष्ट्रगॅसची पाईपलाईन फुटल्याने भीषण आग; मध्यरात्री पुण्यात ‘अग्नितांडव’

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असणा-या राजाराम पुलाजवळ एमएनजीएल गॅस पाईपलाईनला अचानक आग लागली. दरम्यान ही घटना गुरुवारी रात्री 12 च्या सुमारास घडली. गॅस पाईपलाईन फुटल्यामुळे जमिनीतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसत होत्या.

तातडीने अग्निशामक दलाच्या 3 गाड्यांना पाचारण करण्यात आले होते. ही आग विझवण्यात आली आहे. या घटनेमुळे सिंहगड रोडवरील या भागातील एका बाजुची वाहतूक थांबवण्यात आली आहे. दुस-या बाजूने वाहने जात आहेत. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आहे.

• नेमकं काय घडलं?

अचानक गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना सिंहगडरोडवरील दांडेकर पुलाजवळ घडली. त्यानंतर मोठी आग लागली. यामुळे एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. एमएनजीएलचे मुख्य अधिकारी व कर्मचारी दाखल होऊन त्यांनी संबंधित विविध लाईन बंद केल्या आहेत. यामुळे मोठा धोका टळला.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles