मुंबई | पीएफआय या संघटनेवर बंदी घालण्याची कारवाई केंद्र सरकारने अलिकडेच केली. त्यानंतर सर्व स्तरांतून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. केंद्र सरकारने पीएफआयवर लावलेल्या बंदीचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. आणि जर का संघावर बंदी घालण्याची मागणी होत असेल, तर त्याची चर्चा केली पाहिजे, असे सुळे म्हणाल्या.
कोणतीही गोष्ट करताना समाजात त्याची चर्चा झाली पाहिजे. देशात ज्या काही गोष्टी होतील, त्या संविधानाच्या चौकटीत राहून झाल्या पाहिजेत. सर्वांना समान न्याय दिला पाहिजे, असे सुळे म्हणाल्या.
त्याचबरोबर मी पीएफआयवरील बंदीबाबत संसदेत देखील केंद्र सरकारला प्रश्न विचारणार आहे, असे सुळे म्हणाल्या. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या विरोधी पक्षांवरील कारवाईवर देखील केंद्राला प्रश्न विचारणार, असे देखील सुळे म्हणाल्या.