Thursday, January 9, 2025

एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात

राष्ट्रीयएलपीजी सिलेंडरच्या दरात कपात

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल झाला आहे. नवे इंधन दर जारी झाले असून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे, मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. दरम्यान नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत घट झाली असून आजपासून 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मुंबईमध्ये 32.50 रुपये, दिल्लीमध्ये 25.50 रुपये, कोलकातामध्ये 36.5 रुपये तर चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1811.50 रुपये किमतीला मिळेल. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नसून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर त्याच दरात मिळतील.

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहा महिने कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत पोहोचले होता. मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1811.50 रुपये इतका असेल. देशाची राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 25.50 रुपयांनी कमी झाल्याने 1859.50 रुपये किमतीला असेल. कोलकातामध्ये गॅस सिलेंडरचा दर 1959 रुपये तर चेन्नईमध्ये 2009 रुपये झाला आहे.

जागतिक बाजारात शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस महाग होण्याची शक्यता आहे. वायू क्षेत्रातून तयार होणाऱ्या गॅससाठी द्यावा लागणारा दर 8.57 प्रति दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी 6.1 प्रति दशलक्ष डॉलर ब्रिटिश थर्मल युनिट होता.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles