मुंबई | शिंदे गटाच्या ऐतिहासिक बंडाने राज्यातील तत्कालिन महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि शिंदे गट-भाजपच्या युतीचं सरकार सत्तेत आलं. शिंदे सरकार सत्तेत आल्यापासूनच हे सरकार कोसळणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे.
शिंदे गट आणि भाजपत नाराजी नाट्य रंगत असल्याच्या चर्चा सुरू असतात. यादरम्यानच, शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या मतदारसंघात युती करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मी माझ्या मतदारसंघात भाजपसोबत युती करणार नाही. मैत्रीपूर्ण लढत करेल, असं मोठं वक्तव्य सत्तारांनी केलं आहे. माझ्या मतदारसंघात माझी ताकद मोठी आहे. त्यामुळे सिल्लोडमध्ये भाजपसोबत युती न करता मैत्रीपूर्ण लढत करणार, असं म्हणत सत्तारांनी त्यांची ठाम भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर देखील भाष्य केलं आहे. शिंदे गटाचा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचा विश्वास अब्दुल सत्तारांनी व्यक्त केला आहे.