शिवसेनेतील अभूतपूर्व बंड आणि फुटीनंतर अखेर निवडणूक आयोगानं पक्षाचं चिन्ह असलेलं धनुष्यबाण गोठवलं. त्यानंतर आयोगानं शिंदे आणि ठाकरे गटाला पसंतीक्रमांचे चिन्ह सादर करण्यासाठी मुदत दिली होती. ती आज संपणार आहे. त्यामुळं आता कोणत्या गटाला कोणतं चिन्ह द्यायचं, याबाबतचा फायनल निर्णय आज निवडणूक आयोग घेणार आहे. त्यामुळं आता निवडणूक आयोग कोणत्या गटाला कोणतं चिन्ह देणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे.