नुकताच ठाण्यात ठाकरे गटाचा महाप्रबोधन मेळावा पार पडला. या मेळाव्यात सुष्मा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केली होती. यानंतर ठाकरे गटाच्या अन्य नेत्यांसह अंधारे यांच्यावर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अंधारे म्हणाल्या, मला अजून कोणतीही पोलीसांची नोटीस मिळाली नाही. नोटीस मिळाली तर पोलीस ठाण्यात हजर राहीन. कारण कायदा माझ्या बापाने लिहिला आहे, त्याचा आदर मी नाही करायचा तर मग कोणी करायचा, त्या नोटीसला कायदेशीर उत्तर देण्यात येईन, असंही त्या म्हणाल्या.
पुढं त्या असंही म्हणाल्या की, जो कोणी खरं बोलेल, त्याला भीती दाखवली जाते. त्यामुळं यात धक्का बसण्यासारखं काही नाही. मोदींजींची नक्कल केल्याप्रकरणी हा गुन्हा असेल तर ही नक्कल नाही. माझ्यापेक्षा जास्त नकला राज ठाकरेंनी केल्या आहेत.
दरम्यान, देशात प्रश्न विचारणं आणि सत्य मांडणं गुन्हा असेल तर आम्ही गुन्हेगार आहे, असंही अंधारे यावेळी म्हणाले