Thursday, December 26, 2024

मोठी बातमी! जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

maharashtraमोठी बातमी! जळगावात एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का

जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे. भुसावळ नगरपालिकेतील एकनाथ खडसे यांच्या समर्थकांवर मोठी कारवाई झाली आहे. माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.

भाजप नगरसेविका पुष्पा बतरा यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी सदर माजी नगराध्यक्ष व नगरसेविकांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती.

नगर विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी याप्रकरणी अंतिम सुनावणी करत माजी नगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांना 6 वर्षासाठी केले निलंबित केल्याचे आदेश पारीत केले आहेत.

दरम्यान, भुसावळ नगरपालिकेच्या अपात्र नगरसेवकांचा निकाल नगर विकास विभागाने कायम ठेवला आहे. त्यामुळे भुसावळच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नगर विकास मंत्रालयातर्फे सदर निकालाबाबत आदेश पारीत करण्यात आला असून नगरपालिकेचे अध्यक्ष रमण भोळे, सदस्य सविता मकासरे, लक्ष्मी मकासरे, प्रमोद नेमाडे, मेघा वाणी, बोधराज चौधरी, शोभा नेमाडे, किरण कोलते, शैलजा नारखेडे यांना अपात्र घोषित केले आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles