पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतात ‘रोजगार मेळा’ मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. या अंतर्गत देशातील 10 लाख जागांसाठी भरती होणार आहे. यामुळं देशातील तरूणांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, सध्या भारत देशातील पाचवी अर्थव्यवस्था आहे. या 7-8 वर्षात आम्ही 10 वरून 5 वर झेप घेतली आहे. मोदींच्या या वक्तव्यामुळं सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही केलं जातंय.
आता आमचा कल तरूणांच्या विकास कौशल्यावर आहे. उद्योगांच्या गरजेनुसार तरूणांना प्रशिक्षित करण्याची मोहिम, प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत चालू आहे. देशातील तरूणांची क्षमता, स्टार्टअप इंडिया मोहिमेमुळं संपूर्ण जगात प्रस्थापित झाली आहे, असंही मोदी म्हणाले.
दरम्यान, मोदींच्या या मोहिमेचा शुभारंभ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की,महाराष्ट्रात लवकरच पोलीस भरती होणार असून लवकरच याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. तसेच 75 हजार तरूणांना नोकऱ्या देण्याचं अश्वासनही त्यांनी दिलं आहे.