मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. २२ ऑक्टोबर रोजी जॅकलिन दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुकेश चंद्रशेखरशी संबंंधित २०० कोटींच्या घोटाळा प्रकरणात हजर राहिली होती. तिचा अंतरिम जामीन १० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आला आहे परंतु अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तिच्या जामिनाला जोरदार विरोध केला.