वायूसेनेत काम करण्याचं अनेक युवकांचं स्वप्न असतं. त्यामुळे आता वायूसेनेत भरती होणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय वायूसेनेत अग्निवीर भरती अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
ही भरती अग्निपथ योजनेेअंतर्गत जानेवारी 2023 च्या बॅचसाठी केली जाणार आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया 7 नोव्हेंबर 2022 पासून सुरु होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे. अधिसुचनेनुसार (notification), ऑनलाइन परिक्षा घेण्यात येणार आहे.
17.5 वर्षे ते 23 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करु शकतात. या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा 18 ते 24 जानेवारी 2023 या कालावधीत घेतली जाणार आहे. इतर माहिती वायूसेनेच्या अधिकृत पेजवर देण्यात आली आहे.
पात्र उमेदवारांना 4 वर्ष वायूदलात काम करण्याची संधी मिळेल. या 4 वर्षात अग्निवीरांना 120 दिवसं सुट्ट्या मिळणार आहेत. 4 वर्षानंतर त्यांना सेवेतून काढण्यात येईल. त्यानंतर त्यांना मोठी रक्कम ही देण्यात येईल.