Tuesday, July 23, 2024

“एकनाथ शिंदे पंधरा आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते”; शिवसेना नेत्याचा मोठा खुलासा

कॉंग्रेस“एकनाथ शिंदे पंधरा आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते”; शिवसेना नेत्याचा मोठा खुलासा

मुंबई | शिवसेनेतील बंडखोर आमदार आणि नेते एकनाथ शिंदे हे सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक भूमिकेत असून त्यांच्यावर रोज नवे आरोप देखील करत आहे.

काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खळबळजनक खुलासा करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. फडणवीस सरकाच्या काळात एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे एक शिष्टमंडळ काँग्रेससोबत सत्ता स्थापनेचा प्रस्ताव घेऊन आले होते, असे अशोक चव्हाण म्हणाले.

त्यानंतर आता शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे 15 आमदारांच्या गटासोबत काँग्रेसध्ये जाणार होते, असे खैरे म्हणाले.

याबाबत शिवसेनेच्या श्रेष्ठींना कळाले तेव्हा त्यांनी निर्णय बदलला. नाहीतर एकनाथ शिंदे तेव्हा देखील गद्दारी करण्याच्या भूमिकेत होेते, असा मोठा आरोप खैरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles