नवी दिल्ली | गर्भपात कायदेशीर की बेकायदेशीर यावर जनमाणसांत मोठे संभ्रम आहेत. पण आता सर्वोच्च न्यायालयाने त्यासंबंधी एक महत्वाचा आणि मोठा निर्णय दिला आहे. महिलांना गर्भपाताचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वतंत्र्य असले पाहिजे, असे न्यायालयाने म्हंटले आहे.
महिला विवाहित असो वा अविवाहित जर दोघांच्या संमतीने गर्भधारणा झाल्यास प्रत्येक महिलेला गर्भपाताचा कायदेशीर अधिकार आहे, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
यात विशेष बाब अशी की, न्यायालयाने अविवाहित महिलेला गर्भपातापासून दूर ठेवणे असंविधानिक असल्याचे म्हंटले आहे. सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपाताचा अधिकार सर्वांना आहे, असे देखील न्यायालयाने निरीक्षण नोंदविले आहे.
गर्भांचे अस्तित्व महिलेच्या शरीरावर अवलंबून असते. त्यामुळे गर्भपाताचा अधिकार महिलांच्या शरीर स्वातंत्र्याचा भाग आहे. जर शासन कोणत्याही महिलेला इच्छा नसताना, गर्भ ठेवण्यास सक्ती करत असेल, तर तो तिच्या सन्मानाला ठेच पोहचवू शकतो, असे देखील न्यायालयाने नमूद केले