पुणे | शिवसेनेच्या अतंर्गत बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि नवे शिंदे सरकार स्थापन झाले. महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे पाहिले जाते.
त्यामुळे राज्यातील गेलेली सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी पवार कोणती रणनीती अवलंबणार याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूचक वक्तव्य केेले आहे.
निवडणुकांत काय होते, हे आमच्यापेक्षा जवळून कोणीच पाहिले नाही. शरद पवारांची 55 वर्षे राजकारणात गेली. 55 वर्षात ते 27 वर्षे सत्तेत आणि 27 वर्षे विरोधी पक्षात होते. पण त्यांना महाराष्ट्रातने विरोधी पक्षात असताना सर्वात जास्त प्रेम दिले.
शरद पवार विरोधी पक्षात गेले की ते दौऱ्यावर निघतात. पण त्या दौऱ्यांमध्ये अशी काय गंमत होते की ते पुन्हा सत्तेत आल्याशिवाय राहत नाहीत. काही दिवस महाराष्ट्राचा दौरा झाला की, ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात, असे सुळे म्हणाल्या. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.