नवी दिल्ली | भारतीय रिझर्व बॅंकेने रेपो दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. आरबीआयचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी पत्रकार परिषद घेत आरबीआयच्या नवीन धोरणाबाबत माहिती जाहीर केली आहे.
आरबीआयने रेपो दरांत 50 बीपीएस पॉईंट म्हणजेच 0.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता कर्जधारकांना जास्तीचा ईएमआय द्यावा लागणार आहे. सोबत नवीन कर्जे देखील महाग झाली आहेत.
नवीन दरांच्या अंमलबजावणीनुसार आता व्याजदर 5.90 टक्के झाला आहे. तसेच साल 2023 मध्ये विकास दर 7 टक्के राहणार असल्याचा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. मागील पाच महिन्यांच्या कालावधीत रेपो दर आतापर्यंत 1.90 टक्के वाढला आहे.
कोरोना महारोग, युक्रेन – रशिया युद्ध यांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर जाणवत आहे. तसेच महागाईवरील नियंत्रणासाठी व्यादरात वाढ केली आहे. आगामी काळात महागाई नियंत्रणात येण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.