गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सातत्यानं घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र गुरुवारी संध्याकाळी कच्च्या तेलाच्या दरांत किंचित वाढ झाली आहे. किंचित वाढीनंतरही कच्च्या तेलाचा दर गेल्या 9 महिन्यांतील नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घट होऊनही देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही.
WTI क्रूडचा नवा दर किरकोळ वाढून 81.42 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. याशिवाय ब्रेंट क्रूड 88.51 डॉलर प्रति बॅरल आहे. महाराष्ट्र सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात पेट्रोलच्या दरांत प्रतिलिटर 5 रुपये आणि डिझेलच्या दरांत 3 रुपयांनी कपात करण्यात आली होती.
भारतीय तेल कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता देशातील पेट्रोल -डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात. आजच्या दरांनुसार, देशातील इंधन दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. एकिकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांतही गेल्या कित्येत दिवसांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्र. लि. आहे, तर डिझेल 94.27 रुपये प्र. लि. आहे.
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्र. लि. आहे, तर डिझेल 89.62 रुपये प्र. लि. आहे.
चेन्नईत पेट्रोल 102.74 रुपये प्र. लि. आहे, तर डिझेल 94.33 रुपये प्र. लि. आहे.
कोलकाता मध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्र. लि. आहे, तर डिझेल 92.76 रुपये प्र. लि. आहे.
महाराष्ट्रात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल परभणी जिल्ह्यात विकलं जात आहे. परभणीत सध्याचा पेट्रोलचा दर 109.41 रुपये आणि डिझेलचा दर 95.81 रुपये प्रति लिटर आहे. तर, राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 106.04 रुपये प्रति लिटर असून डिझेलचा दर 92.59 रुपये इतका आहे. पुण्यात पेट्रोलचा दर 105.84 रुपये आणि डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर इतका आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.47 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 93.01 रुपये प्रति लिटर इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 108 रुपये आणि डिझेलचा दर 95.96 प्रति लिटर इतका आहे.