नवी दिल्ली | शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत मोठा बदल केला आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आता शेतकरी पोर्टलवर जाऊन आधार क्रमांकावरून आपले स्टेटस पाहू शकणार नाहीत.
शेतकऱ्यांना स्टेटस पाहण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकावा लागेल. आधी असा नियम होता की शेतकरी आपला नंबर टाकून स्टेटस चेक करू शकत होते. यानंतर यात बदल होऊन शेतकरी आधारनंबरवरून स्टेटस पाहू शकतील.
तुम्हाला स्टेटस पाहण्यासाठी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागेल. यावर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करावं लागेल.
दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले जातात, जे प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात.