Monday, June 24, 2024

आजपासून इंटरनेट सुस्साट, ‘या’ शहरात मिळेल 5G सेवा

राष्ट्रीयआजपासून इंटरनेट सुस्साट, 'या' शहरात मिळेल 5G सेवा

5G सेवा सुरु झाल्याने भारतात आज इंटरनेट क्रांती झाली. दावा केला जात आहे की, ही सेवा पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यानंतर इंटरनेट अधिक वेगवान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही सेवा आजपासून सुरु झाली.

देशातील 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु करण्यात येणार आहे. दिवाळीपर्यंत या 13 शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु होईल. त्यानंतर हळूहळू 5G इंटरनेट सेवेचं जाळं देशभर विस्तारत जाईल. मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, चंदीगड, गुरुग्राम, हैदराबाद, लखनौ, गांधीनगर, अहमदाबाद आणि जामनगर या 13 शहरांमध्ये 5G सेवा सुरु होणार आहे.

5G सेवा 4G पेक्षा अनेक पटीने वेगवान गती देते. लॅग-फ्री कनेक्टिव्हिटीला समर्थन देते. कोट्यवधी कनेक्टेड डिव्हाइसेसना रिअल टाइममध्ये डेटा शेअर करण्यास सक्षम करते. 4G च्या 100 Mbps च्या तुलनेत 5G वर इंटरनेटचा वेग 10 Gbps पर्यंत पोहोचू शकतो. हे तुमच्या 5G कव्हरेजवर अवलंबून असेल आणि डाउनलोडची गती 1Gbps ते 10Gbps पर्यंत असू शकते.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles