नवी दिल्ली : महाराष्ट्रातील शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमोल कोल्हे यांनी अमित शाहांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण, ही भेट ‘शिवप्रताप गरुडझेप’ या चित्रपटाच्या निमित्ताने असल्याचं कोल्हे यांनी म्हटले आहे. पण, शाहांची भेट घेतल्याने मतदारसंघात उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.