Monday, April 15, 2024

भारताच्या मंगळयान मिशनचा ८ वर्षांनी शेवट; केवळ ६ महिन्यांसाठी आखली होती मोहीम

तंत्रज्ञानभारताच्या मंगळयान मिशनचा ८ वर्षांनी शेवट; केवळ ६ महिन्यांसाठी आखली होती मोहीम

इस्रोच्या बहुचर्चित मंगळयान मोहिमेचा काल शेवट झाला. मार्स ऑर्बिटर मिशन यानाचा इस्रोशी संपर्क तुटला. केवळ ६ महिन्यांसाठी हे यान पाठवले होते. पण या यांनाने तब्बल ८ वर्ष काम केले.

भारताच्या बहुचर्चित आणि संपूर्ण जागत कौतुकाचा विषय ठरलेल्या मंगळयान मोहिमेचा रविवारी शेवट झाला. मार्स ऑर्बिटर यानाशी इस्रोचा संपर्क तुटला यामुळे या मोहिमेचा शेवट झाला असे मानल्या जात आहे. या यानाची बॅटरी आणि इंधन देखील संपले होते. मंगळाचा अभ्यास करण्यासाठी २०१३ मध्ये हे यान पाठवण्यात आले होते. केवळ सहा महिन्यांसाठी ही योजना आखण्यात आली होती. मात्र, या यांनाने तब्बल ८ वर्ष ही मोहीम सुरू ठेवली.

इस्रोने या मोहिमेसंदर्भात पीटीआयला माहिती दिली आहे. त्यानुसार या यानातील इंधन संपले आहे, तसेच या यानातील बॅटरी देखील डाऊन झाली आहे. त्यामुळे इस्रोचा या यानाशी संपर्क तुटला आहे. त्यामुळे ही मोहीम संपुष्टात आली आहे असे बोलल्या जात आहे. ही मोहीम इस्रोने केवळ सहा महिन्यांसाठी आखली होती. मात्र, ही मोहीम तब्बल ८ वर्ष चालली हे इस्रोचे यश मानले जाते. या यानाने मंगळ यानाचे अनेक फोटो पाठवले. यामुळे मोठी माहिती ही इस्रोला मिळाली आहे. मंगळयान मोहिमेने अनेक मोठ्या अंतराळ संस्थेने जे केले नाही ते करून दाखवले आहे.

इस्रोने ५ नोव्हेंबर रोजी श्रीहरीकोटा येथून २०१३मध्ये हे यान मंगळाच्या दिशेने प्रक्षेपित केले होते. २४ सप्टेंबर रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत पोहोचले. या मोहिमेच्या द्वारे इस्रोने इतिहास रचला. पहिल्याच प्रयत्नात मंगळवार पोहचणारा भारत हा पहिला देश ठरला. या मोहिमेसाठी केवळ४५० कोटी रुपये खर्च आला. ही रक्कम हॉलीवूडच्या चित्रपटांच्या बजेट पेक्षाची कमी असल्याने देखील इस्रोचे मोठे कौतुक झाले होते.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles