Tuesday, May 21, 2024

आज निवडणूक झाल्यास गुजरातमध्ये ‘आप’चं सरकार, IB च्या हवाल्यानं केजरीवाल यांचा दावा

राजकीयआज निवडणूक झाल्यास गुजरातमध्ये 'आप'चं सरकार, IB च्या हवाल्यानं केजरीवाल यांचा दावा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आयबीचा रिपोर्ट मिळाल्याचं सांगत खळबळजनक असा दावा केलाय. इतकंच नाही तर भाजप आणि काँग्रेसने हातमिळवणी केल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दावा केला आहे की गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार येईल. रविवारी त्यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की आज निवडणूक झाली तर राज्यात आपचं सरकार बनेल असा दावा केजरीवाल यांनी केला. काँग्रेसने केजरीवाल यांचा हा दावा फेटाळला आहे.

राजकोटमध्ये एका पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल म्हणाले की, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयबीच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की गुजरातमध्ये आज विधानसभा निवडणूक झाली तर आम आदमी पार्टीचं सरकार बनेल. आप कमी अंतराने सरकार स्थापन करेल. आम्ही खूप कमी जागांनी भाजपपेक्षा पुढे आहे. जनता गुजरात सरकारला मोठा धक्का देण्यास निघाली आहे.

केजरीवाल यांनी लोकांना मोठ्या संख्येने आपला मतदान करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले की, निवडणुकीत प्रचंड बहुमत पाहिजे आहे. तसंच जेव्हा रिपोर्ट सरकारला मिळाला आहे. भाजप आणि काँग्रेसने हात मिळवणी केली असून त्यांच्यात एकत्र बैठकही सुरू आहे. भाजप या रिपोर्टमुळे घाबरली आहे. दोन्ही पक्षाचे नेते आपवर एकाच भाषेत आरोप करत असल्याचंही केजरीवाल म्हणाले.

केजरीवाल यांनी पक्षावर केलेल्या आरोपानंतर काँग्रेस नेत्यांनी तिखट अशी प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल यांच्या दाव्यावर प्रश्न विचारताना काँग्रेस प्रवक्ते मनीष दोशी म्हणाले की, प्रत्येकाला माहितीय केजरीवाल खोटे आहेत. त्यांच्या दाव्यानंतर प्रश्न हा आहे की आयबीचा रिपोर्ट केजरीवाल यांच्यापर्यंत कसा पोहोचला? हा गोपनिय रिपोर्ट सार्वजनिक का केला? आयबीचा रिपोर्ट सार्वजनिक करणं गोपनियतेच्या शपथेचं उल्लंघन नाही का? केजरीवाल हे एक माजी अधिकारी आहेत त्यांना हे माहिती असायला हवं.

काँग्रेसने केजरीवाल यांनी केलेल्या दाव्यांची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. गुजरातच्या लोकांशी खोटं बोलल्याबद्दल केजरीवाल यांनी माफी मागायला हवी असं काँग्रेसने म्हटलंय. केजरीवाल आणि काँग्रेस हे एकमेकांवर टीका करताना नेहमीच ते भाजपची बी टीम असल्याचाही आरोप करतात.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles