समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संरक्षक मुलायम सिंह यादव यांची प्रकृती पुन्हा एकदा खराब झाली आहे. मुलायम सिंह यादव गेल्या काही दिवसांपासून गुरुग्राम येथील मेदांता भरती असून त्यांचावर उपचार सुरू आहेत. रविवारी त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. डॉ. नरेश त्रेहन आणि डॉ. सुशीला कटारिया हे त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असून त्यांचे उपचार सुरू आहेत.