मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे. आत्मघाती हल्ला करून मारण्याची धमकी मिळाली आहे. गुप्तचर विभागाला ही माहिती मिळालीये.
गुप्तचर विभागाला सदर माहिती मिळाली. मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देखील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही महिन्यांपूर्वी देखील जिवे मारण्याची धमकी मिळाली होती.
मुख्यमंत्र्यांना या आधी जिवे मारण्याचे धमकी पत्र त्यांच्या कार्यालयात आले होते. तसेच धमकीचा निनावी फोन देखील आला होता.
मुख्यमंत्र्यांना या आधी नक्षलवाद्यांनी देखील जिवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाली आहे.