मुंबई | भाजप नेते गिरीश महाजन यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. खडसेंनी सर्व काही मिटवण्यासाठी मला आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती, असा दावा गिरीश महाजनांनी केला आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत अस्वस्थ आहेत का?, असा सवाल केला जात आहे.
नाथाभाऊ हे अमित शहांना भेटायला गेले होते. त्यावेळी ते शहांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयाबाहेर बसले होते. तीन तास बसले होते, असंही त्यांनी सांगितलं.
एवढा वेळ बसूनही शहा यांनी खडसेंना भेट दिली नाही. हे स्वत: रक्षा खडसे यांनीच मला सांगितलं, असा दावा महाजन यांनी केला होता. त्यामुळे खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर आहेत का?, असा प्रश्न विचारला जात आहे.
मला शहांच्या कार्यालयातून फोन आला होता. मी माहिती घेतली. त्यावेळी शहांची भेट घेण्यासाठी आम्ही तीन तास त्यांच्या कार्यालयाबाहेर बसून असल्याचं रक्षा खडसे यांनीच मला सांगितलं, असं ते म्हणाले.