कॉंग्रेसचे पूर्व अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. आज ते म्हैसूर या ठिकाणी गेले होते. त्यांची सभा सुरू असतांना अचानक पाऊस आला. भर पावसात राहुल गांधी यांनी त्यांची सभा सुरूच ठेवली. त्यांच्या सभेमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या २०१९ च्या त्या सभेच्या आठवणी ताज्या झाल्यात.
कॉंग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’साठी राहुल गांधी हे संपूर्ण भारत दौऱ्यावर आहेत. या यात्रेदरम्यान राहुल गांधी रोज एका सभेला संबोधित करत असतात. त्यांची यात्रा भाजप शाशीत कर्नाटक राज्यात पोहचली आहे. कर्नाटक दौऱ्याचा त्यांचा रविवारचा तिसरा दिवस होता. आज ते म्हैसूर येथे गेले होते. या दौऱ्यात त्यांचा अंदाज काही वेगळाच होता. म्हैसूर येथे ते एका सभेला संबोधित करत होते. यावेळी अचानक पाऊस सुरू झाला. मात्र, राहुल गांधी यांनी त्यांचे भाषण हे सुरच ठेवले. राहुल गांधी यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या या पावसातील सभेमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
२०१९ मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा येथे झालेल्या प्रचार सभेला संबोधित करत असताना मध्येच मोठा पाऊस आला. भर पावसांत शरद पवार हे सभेला संबोधित करत राहिले. यावेळी त्यांनी छत्री घेण्यासही नकार दिला होता. या सभेमुळे निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले होते. पवार यांनी या भाषणादरम्यान पडणाऱ्या पावसाला ‘वरुण राजा’चा आशीर्वाद संबोधले होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीत उदयन राजे यांचा पराभव झाला होता.
शरद पवार यांच्या याच सभेप्रमाणे राहुल गांधी यांच्या देखील एका सभेत मोठ्या प्रमाणात पाऊस आला. राहुलग गांधी हे भारत जोडो यात्रे दरम्यान हे म्हैसूर येथे आले असता त्यांची सभा ही सुरू होती. यावेळी राहुल गांधी म्हणाले, आम्हाला भारताला कुणी एकसंघ बनविण्यास कुणी थांबवू शकणार नाही. कन्याकुमारी पासून ते कश्मीर तक आमची ही पदयात्रा जाणार आहे. त्यामुळे भारताला जोडण्यासाठी कुणी नाही थांबवू शकत असे देखील राहुल गांधी म्हणाले.
त्यांचे ही भाषण सुरू असताना पाऊस आला. मात्र, त्यांनी न भर पावसात त्यांचे भाषण हे सुरूच ठेवले. या भाषणाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. कांग्रेस नेता जयराम रमेश म्हणाले, राहुल गांधी हे भर पावसात भिजत सभेला संबोधित करत राहिले. रमेश यांनी त्यांच्या व्हिडिओ ट्विट करत लिहिले आहे की, गांधी जयंतीच्या संध्याकाळी म्हैसूर येथे मुसळधार पावसात राहुल गांधी यांनी न डगमगता नागरिकांना राहुल गांधी हे संबोधित करत राहिले. भारत जोड़ो यात्रा ही संपूर्ण भरताला एकजूट करण्यासाठी, बेरोजगारी आणि महागाई यांच्या विरोधात आम्हाला आवाज उठवण्यास कुणी थांबवू शकणार नाही असे देखील राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. त्यात असे लिहिले आहे की, हा कुठला बहाणा नसून राहुल गांधी यांच्यातील जुनुन आहे. भारत जोडो यात्रेला तिचे लक्ष गाठण्यापासून कुणी रोखूशकणार नाही असे देखील त्या ट्विटमध्ये लिहिण्यात आले होते.