दसरा मेळाव्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच रंगलेलं पाहायला मिळत आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या शिवसेनेच्या परंपरेनुसार उद्धव ठाकरे शीवतीर्थावर दसरा मेळावा घेत आहेत. तर आम्हीच खरी शिवसेना म्हणत शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे.
दसरा मेळाव्यात वरचढ ठरण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन सुरू आहे. दसरा मेळाव्याच्या आधीच आरोप-प्रत्योरोप सुरू असताना मनसे नेते प्रकाश महाजन यांनी यावरून जोरदार टीका केली आहे.
यंदाच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नाहीत. एकमेकांचे वस्त्रहरण करणार आहेत. सोनं लुटण्याऐवजी अंगावरच्या चिंध्या गोळा कराव्या लागतील, अशी खोचक टीका प्रकाश महाजनांनी केली आहे.
दरम्यान, आता पहिल्यांदाच कोणाकडे डोकी जास्त आहेत त्यावरून खरी शिवसेना कुणाची हे ठरणार. दसरा मेळाव्यात विचार नाही तर नाटकं पाहायला मिळतील, असा टोला देखील महाजनांनी लगावला आहे.