मुंबईत पहिल्यांदाच दसऱ्यादिवशी शिवसेनेचेच दोन भव्य मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. ठाकरे कुटुंबीयांच्या शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा नेहमीप्रमाणे शीवतीर्थावरच होत आहे. तर शिंदे गट खरी शिवसेना म्हणजे आम्ही असा दावा करत बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेत आहे.
राज्यात दसरा मेळाव्यांवरून राजकारण रंगलं आहे. कोणाचा दसरा मेळावा वरचढ ठरणार याची चर्चा रंगली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी यावर भाष्य केलं आहे.
पॉलिटिकली आपल्याला प्रत्येक राजकारणी व्यक्तीचं काय म्हणणं असतं ते ऐकणं गरजेचं असतं. त्यामुळे मी दोघांच्याही मेळाव्यातलं भाषण ऐकणार. मात्र, पण एकनाथ शिंदेच माझे फेव्हरेट आहेत. एकनाथ शिंदे जिंदाबाद.. , असं वक्तव्य अमृता फडणवीसांनी केली आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदेंच्याच दसरा मेळाव्याला गर्दी होईल, असा दावा देखील अमृता फडणवीसांनी केला आहे. तर एकनाथ शिंदे जिंदाबाद म्हणत अमृता फडणवीसांनी शिंदेंच्या मेळाव्याला पाठिंबा दिला आहे.