मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. 100 कोटी रूपयांच्या वसुली प्रकरणी ईडीने देशमुखांना अटक केली होती.
देशमुखांना 1 लाख रूपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर झाला आहे. तब्बल 11 महिन्यांनंतर ईडीच्या केसमध्ये देशमुखांना जामीन मंजूर झाला पण तरीही त्यांना अजूनही तुरूंगातच राहावं लागणार आहे.
सीबीआयचं आर्थिक गैरव्यवहार प्रकरण अजूनही प्रलंबित असून देशमुख सध्या सीबीआय कोठडीत आहेत. तसेच ईडीनेही देशमुखांच्या जामीनावर आक्षेप घेतल्याने न्यायालयाने 13 तारखेपर्यंत या निर्णयाला स्थगिती दिली आहे.
दरम्यान, वय आणि वैद्यकीय अडचणींच्या मुद्द्यावर देशमुखांना 100 कोटींच्या वसूली प्रकरणात जामीन मंजूर झाला. तर देशमुख आता सीबीआय प्रकरणातही जामीन अर्ज दाखल करणार आहेत. सीबीआय प्रकरणीही जामीन मंजूर झाला तर अनिल देशमुख या महिनाअखेरपर्यंत कोठडीतून बाहेर येऊ शकतात.