बीकेसी मैदानावरील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉँग्रेसवर टीका केली होती. त्यांचा या टीकेच्या समाचार आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी समाचार घेतला आहे. पटोले म्हणाले, स्वतःच्या पक्षाचा पत्ता नसलेल्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये. काँग्रेसला दोष देऊन एकनाथ शिंदेंना गद्दारीचे पाप लपवता येणार नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.