अमेरिकेतील कॅलिफोर्नियात पंजाबमधील एका कुटुंबाचे अपहरण झाले होते. त्या चार सदस्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामध्ये एका आठ महिन्यांच्या मुलीचाही समावेश आहे. मर्स्ड काउंटीचे शेरिफ वर्न वार्नके यांनी सांगितले की, हे खूपच भयंकर आणि भीतीदायक आहे. पीडीतांचे शव त्याच भागात सापडले आहेत.