पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनावेळी नदीला अचानक आलेल्या पुरामुळे बुधवारी रात्री दुर्गा विसर्जनावेळी मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी इथं माल नदीला अचानक पूर आला. तेव्हा विसर्जनासाठी गेलेल्यांपैकी काहीजण वाहून गेले. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप काही लोक बेपत्ता आहेत. तसंच अनेकजण नदीत अडकले आहेत.