Sunday, April 21, 2024

मुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक

देशमुकेश अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला बिहारमधून अटक

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना त्याचा मुंबईतील रुग्णालयात फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असून हा फोन बिहारमधून आल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांच्या पथकाने एका आरोपीला बिहारच्या दरभंगा येथून अटक केली आहे. या आरोपीला घेऊन पोलिसांचे पथक मुंबईत आले असून त्याची चौकशी केली जात आहे.

राकेश कुमार मिश्रा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने मुकेश अंबानी यांच्या सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमधील लँडलाइनवर काही दिवसंपूर्वी फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपींनी फोन करून हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली होती. तसेच मुकेश अंबानी, त्यांची पत्नी नीता आणि त्यांचा मुलगा आकाश यांना जीवे मारण्याची आणि मुंबईतील अल्टामाउंट रोडवरील अंबानींचे निवासस्थान, अँटिलिया उडवून देण्याची धमकी दिली होती. या प्रकारामुळे खळबळ उडाली होती.

अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या घटनेची गंभीर दखल घेऊन मुंबई पोलिसांनी याचा तपास सुरू केला होता. दरम्यान हा फोन बिहार येथून आल्याचे पोलिसांना कळले. त्यांनी तपास पथक बिहारच्या दरभंगा येथे पाठवले. त्यांनी राकेश कुमार मिश्राला तेथून अटक केली. राकेश कुमार मिश्रा हा बेरोजगार असून त्याने हे कृत्य का केले याचा तपास पोलिस करत आहेत. मुंबई पोलिसांच्या एका पथकाने बिहार पोलिसांच्या मदतीने बुधवारी मध्यरात्री बिहारमधील दरभंगा येथील एका ब्लॉकमधून राकेशला अटक केली, अशी माहिती झोन दोनचे डीसीपी नीलोत्पल यांनी दिली.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles