Wednesday, October 30, 2024

मोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात

देशमोदींनी उद्घाटन केल्यानंतर सहाव्या दिवशीच वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत एक्स्प्रेसचं आठवड्याभरापूर्वी उद्गाटन केलं होतं. उद्घाटनानंतर १ ऑक्टोबरला प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. आज सकाळी गुजरातमधील मनीनगर इथं हा अपघात झाला असून यामध्ये रेल्वेच्या समोरच्या भागाचं नुकसान झालं आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रेल्वे गांधीनगरहून मुंबईला येत होती. त्यावेळी लोहमार्गावर काही जनावरे आडवी आल्यानं हा अपघात झाला. यामध्ये रेल्वेच्या समोरच्या भागाचं नुकसान झालं आहे. मात्र यामुळे रेल्वेच्या सेवेवर काही परिणाम झालेला नाही अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे.

गुजरातमधील वटवा ते मनीनगर यादरम्यान सकाळी सव्वा अकरा वाजता वंदे भारत एक्स्प्रेसचा अपघात झाला. वंदे भारत एक्स्प्रेस ही मुंबई ते अहमादाबाद अशी धावणारी सेमी हायस्पीड रेल्वे आहे. या रेल्वेचा प्रतितास वेग आहे २०० किमी इतका आहे. अहमदाबाद ते मुंबई प्रवास कऱणाऱ्यांसाठी ही सेवा सोयीची ठरत आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये शताब्दी एक्स्प्रेससारखा ट्रॅव्हल क्लास आहे. यामुळे प्रवाशांना चांगली सुविदा मिळते. लोकांनी कमी वेळेत पोहोचवते. तसंच सर्व कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे आहत. तसचं एक जीपीएस आधारीत ऑडिओ व्हिज्युअल प्रणाली असून यामधून प्रवाशांना माहिती दिली जाते. तसंच बसण्यासाठी आरामदायी अशी व्यवस्ता आहे. तर एक्झिक्युटीव्ह क्लासमध्ये रोटेटिंग खुर्च्या आहेत तर बायो व्हॅक्युम वॉशरूम्स आहेत. आठवड्यातून ६ दिवस या ट्रेन अहमदाबादहून मुंबईला येतात. मुंबईतून काळी सव्वा सहा वाजता निघते आणि १२.१० वाजता गांधी नगरला पोहोचते. तर दुपारी दोन वाजता निघून रात्री साडे आठ वाजता मुंबईत पोहोचते.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles