Sunday, April 21, 2024

विदेशातील नोकरीत भारतीयांची फसवणूक.

दुनियाविदेशातील नोकरीत भारतीयांची फसवणूक.

सोशल मीडियावर जाहिरात देऊन लोकांना जास्त पगाराच्या नोकऱ्या देण्याचे आमिष दाखविण्याचे प्रकरण समोर आले असून हे 16 भारतीयांच्या जीवावर बेतले होते.ऑगस्ट महिन्यात म्यानमारमधून 16 भारतीय भारतात परतले आहेत मात्र त्याआधी 2 महिने हे त्यांच्यासाठी एक भयानक स्वप्न ठरले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार त्यांना सोशल मीडिया साइट्सवर उत्तम नोकऱ्या आणि उत्तम पगाराची ऑफर देऊन प्रथम दुबई आणि नंतर बँकॉकला बोलावण्यात आले आणि त्यानंतर हि घटना घडली.

तेथे त्यांना नोकरी देण्यात आली, नोकरीच्या नावाखाली 1 महिना पगार देण्यात आला, त्यानंतर त्यांचे अपहरण करून म्यानमारला नेण्यात आले. म्यानमारमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना सायबर गुन्हेगार म्हणून काम करण्यास प्रवृत्त केले गेले. त्यांना सोशल मीडिया प्रोफाइल तयार करून श्रीमंत लोकांना टार्गेट करणे आणि बिझनेस प्रपोजलच्या नावाखाली त्यांची फसवणूक करणे हे काम करण्यास लावले होते. चेन्नईच्या आसपास राहणाऱ्या काही लोकांनी सोशल मीडिया साइटवर एका चांगल्या नोकरीची जाहिरात पाहिली. हे सर्व लोक आधीच काम करत होते परंतु दरमहा $ 1000 पगाराने त्यांना आकर्षित केले आणि या सर्व लोकांनी अर्ज केला. या लोकांना दुबईत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. तेथे त्याला दरमहा $1100 पगाराचे आश्वासन देण्यात आले.

यानंतर त्यांना नोकरीची ऑफर आली आणि ते तिथे काम करू लागले. काही दिवसांनी त्यांना सांगण्यात आले की, आता तेथून थायलंडला जावे लागेल. या लोकांना कंपनीचे ओळखपत्रही देण्यात आले होते आणि त्यावर फक्त एक फोटो होता आणि चिनी भाषेत काहीतरी लिहिले होते. ते योग्य ओळखपत्र दिसत नव्हते. यानंतर त्यांना दुबईहून बँकॉकला नेण्यात आले. बँकॉकला पोहोचताच या लोकांचा त्रास सुरू झाला. यानंतर पुढचे काही दिवस या सर्व भारतीयांसाठी अत्यंत दुःखद अनुभव होता. ते अज्ञात स्थळी पोहोचले, त्यांचा फोन त्यांच्याकडून हिसकावण्यात आला. यासोबतच त्याच्या मोबाईलसह पासपोर्ट आणि इतर कागदपत्रेही त्यांच्या कडून काढून घेण्यात आली. यानंतर त्यांना कारमधून नदीकाठावर नेण्यात आले आणि नदी पार केल्यानंतर हे लोक म्यानमारमध्ये पोहोचले.

या भारतीयांचे म्हणणे आहे की, तिथे गेल्यानंतर त्यांना तुरुंगात गेल्यासारखे वाटले. तिथे या लोकांना त्यांच्या टार्गेटनुसार काम करायचे होते आणि त्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार करण्याची परवानगी नव्हती, तिथे त्यांचा छळ देखील कारण्यात आला. या लोकांनी एजंटशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ज्याने त्यांना नोकरी मिळवून दिली होती, परंतु त्याने त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही. यानंतर या लोकांनी तेथून कसा तरी पळून जाण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर बनावट प्रोफाइल तयार करून, श्रीमंत लोकांना गुगल प्ले स्टोअरवर उपस्थित असलेल्या प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या गुंतवणुकीची ऑफर दिली जात होती. त्याने गुंतवणूक करताच ती गोष्ट थांबवने, ही त्यांची व्यवसायाची पद्धत होती. या यादीत भारतात व्यवसाय करणाऱ्या 3000 भारतीयांचीही नावे देखील होती. चेन्नईला परतलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, “आम्हाला हे काम सुरुवातीपासून आवडले नाही, पण त्रास टाळण्यासाठी आम्हाला हे काम करावे लागले, हे काम सरळ काम आहे असे सांगण्यात आले होते परंतु येथे ग्राहकांची फसवणूक केली जात होती. त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले जायचे आणि जेव्हा त्यांनी गुंतवणूक केली, तेव्हा ते अॅप बंद व्हायचे.

Check out our other content

Check out other tags:

Most Popular Articles