राज्यातील महाविकास आघाडी पोटनिवडणूक, महापालिका निवडणूक आणि विधानसाभा निवडणुकीत कायम राहणार का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहिला. याचदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी युतीसंबंधी एक वक्तव्य केलं होतं. ‘युती करायची असेल तर काँग्रेस आणि शिवसेनेसोबत करु’, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.
आंबेडकरांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे विचार त्यांना मान्य असतील तर आम्ही त्यांच्यासोबत युतीसाठी तयार आहोत. आम्हाला युती करण्यास काही अडचण नसल्याचंही पटोलेंनी सांगितलं.
दरम्यान, समोरासमोर येऊन चर्चा करत पावलं टाकली तर योग्य राहिल, असंही नाना पटोलेंनी म्हटलंय. पटोलेंच्या या प्रतिक्रीयेमुळे राजकीय गोटात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीतील युतीच्या चर्चांना उधाण आलंय.