गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आंदोलन केलं होतं आणि संपही पुकारला होता. या प्रकरणी 10 हजारांहून अनेक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
या कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर मोठ्या प्रमाणात गर्दी करून संताप व्यक्त केला होता. त्यावेळी अनेक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं. हे प्रकरण राज्य सरकारने गांभीर्याने घेत 118 कर्मचाऱ्यांचे निलंबन केले होते.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक नवीन निर्णय घेतले. यातीलच महत्वपूर्ण निर्णय काल राज्य सरकारकडून घेण्यात आला. एसटी महामंडळातील या निलंबित कर्मचाऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने या सर्व कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द केले आहे. लवकरच एसटी कर्मचारी सेवेत दाखल होणार आहेत.