केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर सोमवारी दुपारपर्यंत नवे चिन्ह आणि नावाचे पर्याय सांगण्यासाठी मुदत दिली आहे. त्यासंदर्भात शिंदे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीवेळी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पीए यांच्यात वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांसमोरच मंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाला शिवीगाळ केल्याची माहिती समोर येत आहे. या वादानंतर मंत्री सत्तार हे बैठकीतून निघून गेल्याचंही सांगण्यात येते.