उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचं आज निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात आज सकाळी ८.१६ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. मुलायमसिंह यांच्या निधनामुळं समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले आहेत