नायजेरीया येथील एनाम्ब्रा शहरात भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने तब्बल ७६ जणांचा मृत्यू झाला. या बोटीत तब्बल ८५ भाविक होते. नदीला पुर आल्याने ही घटना घडली असे सांगण्यात येत आहे. नाइजीरियाचे राष्ट्रपती मुहम्मदु बुहारी यांनी ट्वीट करून या घटनेवर दुख: व्यक्त केले आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे.