मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोगलांची उपमा देत असा दानव हिंदुस्थानच्या इतिहासात पाच हजार वर्षा झाला नसेल अशा शब्दात टीका करण्यात आली आहे. केंद्रातील भाजप सरकारवर अग्रलेखातून निशाणा साधण्यात आलाय.
शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. तसंच शिवसेना हे नावही ठाकरे आणि शिंदे गटाला वापरता येणार नाहीय. त्यावरून आता सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटाचा समाचार घेण्यात आला आहे. बेईमान गारद्यांनी आईशीच बेईमानी केली असं अग्रलेखात म्हटलंय. कोणी कितीही कट–कारस्थाने केली, बेइमानीचे घाव घातले तरी शिवसेना संपणार नाही. ती पुन्हा जन्म घेईल, झेपावेल, उसळेल, दुष्मनांच्या नरडीचा घोट घेईल. निवडणूक आयोगाने आता शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आणि ‘शिवसेना’ हे नाव स्वतंत्रपणे वापरण्यास मनाई करणारा अंतरिम आदेश काढला. दिल्लीने हे पाप केले. बेइमान गारद्यांनी आईशीच बेइमानी केली! आम्ही शेवटी इतकेच सांगतो, कितीही संकटे येऊ द्या, त्यांच्या छाताडावर पाय देऊन आम्ही उभे राहूच अशा शब्दात सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गटावर घणाघाती टीका करण्यात आलीय.