भारतीय जनता पक्षाचे बीड शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी स्वत:वरच गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेची माहिती समजताच बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. आज सकाळी ही घटना घडली असून त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.