उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्यावर आज दुपारी 3 वाजता अंतिम संस्कार केलं जाणार आहेत. त्यांचे पार्थिव सैफईच्या मेला ग्राऊंडमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यदर्शनासाठी देशभरातील मोठे नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. मुलायम सिंह यादव यांचं काल निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.